TED Talks with Marathi transcript

युस बहरचं जबरदस्त मोटरसायकल डिझाईन

TED2009

युस बहरचं जबरदस्त मोटरसायकल डिझाईन
627,065 views

युस बहर आणि फॉरेस्ट नॉर्थ सादर करीत आहेत - मिशन वन, एक सुरेख, शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटरसायकल. त्यांच्या निराळ्या (पण समान) बालपणाच्या स्लाईड्समधून दिसेल, एकत्रित काम करण्यातून जुळलेली त्यांची मैत्री - आणि त्यांनी पाहिलेलं समान स्वप्न.

मेरी रोच: कामोन्मादाबद्दल तुम्हांला माहिती नसलेल्या १० गोष्टी

TED2009

मेरी रोच: कामोन्मादाबद्दल तुम्हांला माहिती नसलेल्या १० गोष्टी
30,520,828 views

कामोन्मादाविषयी विलक्षण आणि गंमतीशीर असे १० दावे करण्यासाठी "बॉंक" च्या लेखिका मेरी रोच अज्ञात अशा शास्त्रीय संशोधनाचा, ज्यातील काही अनेक शतकं जुनं आहे, सखोल अभ्यास करतात. (हे व्याख्यान प्रौढांसाठी आहे. दर्शकांनी खबरदारी घ्यावी).

नंदन निलेकणी यांच्या भारताच्या भविष्याबद्दलच्या कल्पना

TED2009

नंदन निलेकणी यांच्या भारताच्या भविष्याबद्दलच्या कल्पना
1,029,216 views

आउटसोर्सिंगमध्ये अग्रेसर असलेल्या 'इन्फोसिस'चे दूरदर्शी प्रमुख कार्यकारी अधिकारी, नंदन निलेकणी, भारताची सध्याची प्रगतीची घोडदौड सुरू राहिल की नाही, हे ठरविणार्‍या चार प्रकारच्या कल्पना समजावत आहेत.

एच.आय.व्ही. बद्दल हॅन्स रॉसलिंग: नवीन तथ्ये आणि आश्चर्यकारक माहितीचित्रे

TED2009

एच.आय.व्ही. बद्दल हॅन्स रॉसलिंग: नवीन तथ्ये आणि आश्चर्यकारक माहितीचित्रे
1,174,291 views

हॅन्स रॉसलिंग जगासमोर उघडत आहेत नविन माहितीचित्रे जी गुंता सोडवतायत धोकादायक गुणकांचा जगातील सर्वात भयानक( आणि न कळलेल्या) रोगांपैकी एकाच्या: एच.आय.व्ही.च्या. त्यांच्या मते ही साथ थांबविण्यासाठी रोगाचा संसर्ग थांबवणे -- औषधोपचरांपेक्षाही -- जास्त महत्त्वाचे आहे.

Bonnie Bassler: जीवाणू कसे "बोलतात"

TED2009

Bonnie Bassler: जीवाणू कसे "बोलतात"
2,683,171 views

बॉनी बॅसलर ह्यांनी शोधून काढलं की जीवाणू एकमेकांशी रासायनिक भाषा वापरून बोलतात, ज्याच्या सहाय्याने त्यांना बाचाव आणि आघात साधता येतात. ह्या शोधाचे आश्चर्यकारक परिणाम अभिप्रेत आहेत, वैद्यकीय क्षेत्रात, उद्योगात -- आणि स्वतःला जाणून घेण्यात.

एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पाय

TED2009

एमी मुल्लीन्स आणि तिचे बारा पाय
4,380,008 views

खेळाडू, अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या एमी मुल्लीन्स तिच्या खोट्या पायांबद्दल सांगत आहे. खोट्या पायांमुळे त्यांना अनेक उत्कृष्ट ताकदी अवगत आहेत - वेग, सौंदर्य आणि ६ इंच जास्त उंची. थोडक्यात शरीर कसे असावे ह्याची व्याख्या त्यांनी बदलली आहे.

चार्लस मूर - प्लास्टिकचे महासागर

TED2009

चार्लस मूर - प्लास्टिकचे महासागर
1,361,667 views

अल्गालिटा सामुद्री संशोधन संस्थेच्या कॅप्टन चार्ल्स मूर यांना प्रथम प्रशांत महासागरावर असलेल्या प्रचंड मोठ्या कचऱ्याच्या पट्ट्याचा शोध लागला - महासागरावर तरंगणारा, अमर्याद पसरलेला प्लास्टिकचा कचरा. आता ते या सतत वाढत चाललेल्या समुद्र व्यापणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.

लुका ट्युरिन: गंध विज्ञान

TED2005

लुका ट्युरिन: गंध विज्ञान
621,001 views

उदात्त अत्तरामागील विज्ञान काय आहे? जैव-भौतिकशास्त्रज्ञ लुका टुरिन सुगंध बनवण्यामागील कला आणि अणु-रेणूंची रचनेचे विज्ञान, मनाला भुरळ पडेल अश्या अचूकप्रमाणे आपल्या पुढे मांडतात.

लॉरा ट्राईस: आभार मानायचे लक्षात ठेवा

TED2008

लॉरा ट्राईस: आभार मानायचे लक्षात ठेवा
2,449,953 views

मैत्री घट्ट करण्यासाठी, बंध सुधारण्यासाठी, समोरच्या व्यक्तीला तिचं तुमच्यालेखी काय महत्व आहे हे कळावं यासाठी - डों. लॉरा ट्राईस या ३ मिनिटांच्या साध्या वर्णनयुक्त व्याख्यानात "आभारी आहे" या जादुई शब्दांच्या ताकदीचे चिंतन करतात. प्रयत्न करून बघा.

हेलन फिशर: प्रेमाच्या अवस्थेत असलेला मेंदू

TED2008

हेलन फिशर: प्रेमाच्या अवस्थेत असलेला मेंदू
6,472,519 views

प्रेमासाठी आपण का झुरतो .आणाभाका का घेतो ,प्रसंगी मरण स्वीकारतो ,आपल्या शरीराच्या या भुकेचे व एकप्रकारच्या व्यसनाचे हेलन फिशर व तिच्या सहकाऱ्यांनी याबदल सशोधन केले आहे. त्यासाठी प्रेमात यशस्वी व अपयशी व्यक्तींच्या मेंदूचे MRI काढून अध्यन केले ,

Murray Gell-Mann यांचे "भाषेचे जनक" वर व्याख्यान

TED2007

Murray Gell-Mann यांचे "भाषेचे जनक" वर व्याख्यान
944,446 views

"भौतिक शास्त्रामधील लावण्य" या विषयावर TED2007 मध्ये बोलल्यावर, आश्चर्यजनक Murray Gell-Mann यांनी वेगळ्या भावनात्मक इच्छेने पटकन टाकलेला दृष्टीक्षेप: "आपल्या आधुनिक भाषांच्या सामाईक जनकाचा शोध"

डीन ओर्निश म्हणतात तुमचे जीन्स (अनुवांशिक गुण) म्हणजे तुमचे भाग्य  नव्हे

TED2008

डीन ओर्निश म्हणतात तुमचे जीन्स (अनुवांशिक गुण) म्हणजे तुमचे भाग्य नव्हे
1,725,634 views

डीन ओर्निश यांचे नवीन संशोधन दर्शविते की आरोग्याला पूरक जीवनशैली आणि पथ्ये पाळली तर त्याचा मनुष्यावर अनुवांशिक पातळीपर्यंत परिणाम पडतो. उदाहरणार्थ, ते म्हणतात, जर तुम्ही स्वस्थ सवयी अंगीकारल्या, पोषक अन्न घेतलं, जास्त व्यायाम आणि प्रेम केलं, तर तुमच्या मेंदूच्या पेशींची संख्या वाढते.

डेव्ह एगर्स: माझी इच्छा: एकदा एका शाळेत

TED2008

डेव्ह एगर्स: माझी इच्छा: एकदा एका शाळेत
1,606,908 views

२००८चे टेडचे बक्षिस घेताना डेव्ह एगर्स टेड कम्युनिटिला स्थानिक सरकारी शाळांमधे वैयक्तिकरित्या आणि सर्जनशीलपणे सहभागी होण्यास सांगतात. खिळवून टाकणाऱ्या उत्साहाने ते ८२६ व्हॅलेंसिया शिक्षण-केंद्राबद्दल सांगतात. त्याने जगभरातील लोकांना स्वयंसेवकांनी चालवलेली, स्वैरपणे सृजनशील असलेली स्वत:ची प्रयोगशाळा काढायला स्फूर्ती दिली.

लक्ष्मी प्रतुरी, पत्र लेखनावर

TED2007

लक्ष्मी प्रतुरी, पत्र लेखनावर
715,735 views

लक्ष्मी प्रतुरी स्मरण करत आहेत हरवलेल्या पत्र लेखनाच्या कलेबद्दल. आणि आपल्याला सांगत आहेत मृत्युपूर्वी वडिलांनी लिहिलेल्या काही टाचणाच्या मालिके बद्दल . त्यांच्या या छोट्या पण हृदयस्पर्शी भाषणावरून तुम्हालाही स्फूर्ती होईल, कागद आणि लेखणी हातात घ्यायची.

विल्यम काम्क्वम्बा: विल्यम काम्क्वम्बा पवनचक्की उभारणीवर

TEDGlobal 2007

विल्यम काम्क्वम्बा: विल्यम काम्क्वम्बा पवनचक्की उभारणीवर
2,952,899 views

केवळ १४ वर्षांचा असताना, मालावीयन शोधक विल्यम काम्क्वम्बा याने आपल्या कुटुंबासाठी वीज निर्माण करणारी पवनचक्की बांधली. काही सुटे भाग वापरून. वाचनालयातल्या एका पुस्तकात सापडलेल्या कच्च्या आराखड्यावरून.

रिचर्ड डॉकिन्स बोलतायत अाक्रमक निरीश्वरवादाबद्दल

TED2002

रिचर्ड डॉकिन्स बोलतायत अाक्रमक निरीश्वरवादाबद्दल
5,735,087 views

रिचर्ड डॉकिन्स सर्व निरीश्वरवाद्यांना प्रवृत्त करतायत त्यांचे विचार खुलेपणाने मांडण्यास -- आणि चर्चने (धर्माने) राजकारणावर आणि विज्ञानावर केलेल्या अतिक्रमणाचा सामना करण्यास. एक धगधगणारे, मजेशीर, ताकदवान भाषण.

रिचर्ड डॉकिन्स सांगतायत आपल्या "विचित्र" विश्वाबद्दल

TEDGlobal 2005

रिचर्ड डॉकिन्स सांगतायत आपल्या "विचित्र" विश्वाबद्दल
4,013,427 views

विश्वातल्या प्रक्रिया कळून घ्यायला मानवी नजर कशी तोकडी पडू शकते हे दाखवत जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स "अतर्क्य गोष्टींचा विचार" करायला सुचवतात.

बॅरी श्वार्ट्झ : निवडीचा विरोधाभास

TEDGlobal 2005

बॅरी श्वार्ट्झ : निवडीचा विरोधाभास
14,210,098 views

मानसशास्त्रज्ञ बॅरी श्वार्ट्झ आपले लक्ष वेधून घेत आहेत, पाश्चात्य समाजातील महत्त्वाच्या तत्त्वाकडे: निवडीच्या स्वातंत्र्याकडे. श्वार्ट्झ यांच्या मते, निवड आपल्याला स्वतंत्र न बनवता दुर्बल बनवते, सुखी न करता असामाधानी बनवते.

ज्युलिया स्वीनी: देवाचा निरोप घेताना

TED2006

ज्युलिया स्वीनी: देवाचा निरोप घेताना
4,604,979 views

ज्युलिया स्वीनी( देव म्हणाला, "हा!") सादर करतायत त्यांच्या एकपात्री "देवाचा निरोप घेताना" मधील पहिली १५ मिनीटे. एक दिवशी जेव्हा दोन मॉर्मन मिशनरी त्यांचे दार ठोठावतात, तेंव्हा सुरू होतो एक प्रवास त्यांच्या स्वतःच्या श्रद्धांबद्दल पूर्णपणे परत विचार करण्याचा.

रिचर्ड सेंट जॉनची  यशाची ८ रहस्ये.

TED2005

रिचर्ड सेंट जॉनची यशाची ८ रहस्ये.
14,410,517 views

लोकं यशस्वी का होतात ? कारण ते हुशार असतात? का ते फक्त नशीबवान असतात ? नाही. विश्लेषक रिचर्ड सेंट जॉन अनेक वर्षांच्या मुलाखातींचा सारांश, चुकवू नये अश्या, यशाच्या खऱ्या रहस्यांवर आधारित ३-मिनीटांच्या स्लाईड शो द्वारे सांगतात.

केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता

TED2006

केन रॉबिन्सन म्हणतात - शाळा मारुन टाकतात निर्मितिक्षमता
64,284,825 views

सर केन रॉबिन्सन एका मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण संभाषणातून मांडत आहेत संकल्पना एका अशा शिक्षण व्यवस्थेची जिथं निर्मिताक्षमता (दडपली जाण्याऐवजी) जोपासली जाते.

एक काव्यात्मक निसर्गचित्रण - Frans Lanting

TED2005

एक काव्यात्मक निसर्गचित्रण - Frans Lanting
2,080,417 views

ह्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्लाईड शो मध्ये , फ्रांस लान्तिंग सादर करतात ' द लाईफ प्रोजेक्ट ', आपल्या पृथ्वीची कहाणी सांगणाऱ्या कवितामय छायाचित्रांचा एक संच , अगदी पृथ्वीच्या स्फोटक आरंभापासून ते आताच्या सर्वांगी विविधतेपर्यंत ! ध्वनी - फिलीप ग्लास