TED Talks with Marathi transcript

सोफी स्कॉट: आपण का हसतो

TED2015

सोफी स्कॉट: आपण का हसतो
3,932,346 views

तुम्हाला माहित आहे एकटे असण्या पेक्षा तुम्ही इतरांसोबत असता तेव्हा तीस पट अधिक हसू शकता. सोफी स्कॉट चेतासंस्था विशारद गतिमान युगात कामात मग्न असलेल्या आपणा सर्वांना हसण्याबाबत विस्मयकारक वैज्ञानिक सत्य सांगतात

कैलाश सत्यार्थी: जगात शांतता कशी आणायची? संतापून.

TED2015

कैलाश सत्यार्थी: जगात शांतता कशी आणायची? संतापून.
1,378,130 views

भारतात, एका उच्च जातीत जन्मलेल्या तरुणाने ८३, ००० मुलांना गुलामगिरीतून कसं वाचवलं? जगात चांगला बदल घडवू इच्छिणाऱ्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी एक आश्चर्यकारक सल्ला देताहेत: अन्यायाविरुद्ध संतापून उठा. या ताकदवान भाषणात ते दाखवून देताहेत, एका संतापभरल्या आयुष्यातून एक शांतताजनक आयुष्य कसं निर्माण झालं.

ताकाहारू तेझुका: जगातली सर्वात सुरेख बालवाडी

TEDxKyoto

ताकाहारू तेझुका: जगातली सर्वात सुरेख बालवाडी
5,156,281 views

टोक्यो मधल्या या शाळेत पाच वर्षांची मुलं ट्रैफ़िक जैम करतात. तिथे खिडक्या असतात त्या सैन्टाक्लॉसला चढता यावं म्हणून. या, पहा ही जगातली सर्वात गोडुली बालवाडी, जिची रचना केली आहे आर्किटेक्ट ताकाहारू तेझुका यांनी. या मनोवेधक भाषणात ते आपल्याला या रचनेमागची प्रक्रिया सांगतात, जी खरोखर मुलांना मुलं म्हणून वावरू देते.

जो डीसिमोन: थ्री डी प्रिंटींग शतपट अधिक वेगवान असलं असतं तर?

TED2015

जो डीसिमोन: थ्री डी प्रिंटींग शतपट अधिक वेगवान असलं असतं तर?
3,783,429 views

जोसेफ डीसिमोन म्हणतात, आपण ज्याचा थ्री डी प्रिंटींग म्हणून विचार करतो ते खरंतर केवळ टु डी प्रिंटींग हळूहळू पुन्हा पुन्हा करणं आहे. TEDx२०१५ च्या मंचावर एका नवीन धाडसी तंत्राचे अनावरण करतात -- जे, हो, टर्मिनेटर २ पासून प्रेरित झालेले आहे -- २५ ते १०० पट अधिक वेगवान आहे, आणि गुळगुळीत, दणकट भाग बनवते. थ्री डी प्रिंटींगबाबत असलेली प्रचंड आशा पूर्ण करण्यास ते मदत करू शकेल का?

अलीसन किलिंग: मरणाचा चांगला मार्ग  त्यासाठी वास्तू विशारदाची मदत

TEDGlobal 2014

अलीसन किलिंग: मरणाचा चांगला मार्ग त्यासाठी वास्तू विशारदाची मदत
1,316,847 views

अलीसन किलिंग थोडक्यात, प्रेरणादायकरित्या सांगतात ते पहातात अशा इमारती ज्यात मृत्यू होतात... दवाखाने ,स्मशानभूमी ,घर आपल्या मृत्यूचे मार्ग बदलत आहेत... आणि मृत्युच्या वास्तूही बदलत आहेत आपल्या शहरातील सुप्त जागा व आपले आयुष्य या बाबत रंजकतेने सांगतात.

रॉंब नाईट: आपले जीवाणू कसे ठरवितात  आपण कोण आहोत

TED2014

रॉंब नाईट: आपले जीवाणू कसे ठरवितात आपण कोण आहोत
2,014,096 views

रॉब नाईट हे मानवी जीवाणूंच्या अभ्यासात अग्रेसर आहेत.एकपेशीय सूक्ष्म जीवाणूंची वसाहत जी मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्याशी निगडीत आहे पण दुर्लक्षित आहे.ही तीन पौंड वजनी वसाहत जी तुम्ही अहोरात्र बाळगता तुमच्या मानवी जीन्सपेक्षा ही का महत्वाची आहे हे जाणून घ्या. रॉंब नाईट म्हणतात…

बेल पेस: आपली स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग

TEDGlobal 2014

बेल पेस: आपली स्वप्नं धुळीला मिळवण्याचे पाच मार्ग
5,370,012 views

आपली सर्वांचीच इच्छा असते, एखादा जग बदलून टाकणारा शोध लावावा. एखादी यशस्वी कंपनी सुरू करावी. एखादं सर्वाधिक खपणारं पुस्तक लिहावं. पण प्रत्यक्षात फारच कमी लोक हे करतात. ब्राझिलियन उद्योजक बेल पेस विश्लेषण करताहेत, सहज विश्वास ठेवण्याजोग्या पाच दंतकथांचं, ज्या तुमची स्वप्नं साकार होऊ देत नाहीत.

लौरा बौश्नक: अश्या महिलां साठी ज्यांना लिहिणे हे मोठे धाडस आहे

TEDGlobal 2014

लौरा बौश्नक: अश्या महिलां साठी ज्यांना लिहिणे हे मोठे धाडस आहे
919,431 views

जगाच्या काही भागात निम्म्या महिलाना मुलभूत लिहिणे वाचणे य इत नाही ,कारण भिन्न आहे पण काही ठिकाणी वडील पती आणि आई देखिल यास महत्व देत नाही फोटोग्राफर व TED सभासद लौरा बौश्नक येमेन ,इजिप्त टयुनिशिया ये थे जाऊन भेटल्या त्यासाठी लढत असलेली वीर महिला शाळेतील विद्यार्थिनीसत से च ६० वर्षाच्या आईस .

गाय विंच: मनावर प्रथमोपचार का करायला हवेत?

TEDxLinnaeusUniversity

गाय विंच: मनावर प्रथमोपचार का करायला हवेत?
10,148,018 views

आपल्याला ताप येत असेल किंवा आपलं अंग दुखत असेल, तर आपण डॉक्टरकडे जातो. पण अपराधी वाटणे, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा एकटेपणा यासारख्या मानसिक दुखण्यासाठी तज्ज्ञांकडे का जात नाही? गाय विंच म्हणतात, सर्वसाधारणपणे अशा मानसिक दुखण्यांना आपण एकटेच तोंड देतो. पण तो काही एकमेव मार्ग नव्हे. आपण आपलं मानसिक आरोग्य सांभाळायलाच हवं. जितक्या काळजीपूर्वक आपण आपलं शारीरिक आरोग्य जपतो, तितक्याच काळजीने आपलं मन आणि भावना जपायला हव्यात.

केनेथ शिनोझुका: माझ्या आजोबांना सुरक्षितता देणारे माझे उपकरण

TEDYouth 2014

केनेथ शिनोझुका: माझ्या आजोबांना सुरक्षितता देणारे माझे उपकरण
1,759,326 views

साठ टक्के मेंदुविकाराने पिडीत रुग्ण बाहेर फिरतात. ते व त्यांची काळजी घेणारे यांना असलेला तणाव याबाबत रंजरीत्या बोलत आहेत केनेथ शिनोझुका लहानग्या केनेथने रात्री भ्रमण करणाऱ्या आपल्या आजोबाना आणि त्यांची काळजी घेणाऱ्या आत्याला म त करण्याचा नवा प्रयोग केला.यातूनच अन्य अल्झ्याय्म्रच्या रुग्णांना मदत अरण्याची नवी आश कशी निर्माण झाली त्याची कथा

जाप दे रोडे: फुलपाखरांचा स्व: औषधोपचार

TEDYouth 2014

जाप दे रोडे: फुलपाखरांचा स्व: औषधोपचार
1,143,584 views

आम्हाला सारखेच , सम्राट फुलपाखरु कधी कधी एका ओंगळ परजीवामुळे आजारी पडतात. पण जीवशास्त्रज्ञ जाप डी रोडे यांचा काही मनोरंजक काही बाबी लक्षात आल्या, आजारी मादी तीच्या संततीला अाजार टाळण्यासाठी एक विशिष्ट प्रकार वनस्पतीची मदत धेते. एका विशिष्ट प्रकारच्या वनस्पती वर ती अंडी घालते. ती कसी या वनस्पती निवडते हे माहित आहे का? मानवी रोग उपचार नवीन औषधे शोधण्यासाठी आपाल्याला हे शिकवू शकते.

अझिझ अबु सारा: सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?

TED2014

अझिझ अबु सारा: सहिष्णुता वाढवण्यासाठी हवं जास्त पर्यटन?
1,494,756 views

अझिझ अबु सारा एक पेलेस्टिनी कार्यकर्ते आहेत. जगात शांतता राखण्याविषयी त्यांचा एक आगळा दृष्टीकोन आहे: पर्यटक व्हा. या TED Fellow ने दाखवून दिलं आहे, की वेगवेगळ्या संस्कृतींमधल्या लोकांच्या एकमेकांशी आलेल्या साध्या संपर्कामुळे कैक दशकांचा द्वेष ओसरू शकतो. ते सुरुवात करतात, पेलेस्टिनी लोकांना इस्त्रायलीं लोकांशी भेटवून. आणि मग त्याहूनही पुढे जातात…

आकाश ओदेद्रा: कागद, हवा आणि प्रकाशाच्या वादळातले नृत्य

TEDGlobal 2014

आकाश ओदेद्रा: कागद, हवा आणि प्रकाशाच्या वादळातले नृत्य
910,308 views

नृत्य दिग्दर्शक आकाश ओदेद्रा हा डिस्लेक्सिक आहे आणि त्याला दरवेळेस वाटते कि त्याचे उत्तम भाव हालचालीतून येतात. "मुरमूर" हि त्याची अनियमित वृत्ताची कविता आहे. पाने जेव्हा त्याच्या भोवती घिरटे घालतात अशा वेळेस - पुस्तकपानी वादळाच्या मध्यभागी रमताना त्याला पहा.

एमिली बालसेटिस: काही लोकांना व्यायाम इतरांपेक्षा कठीण का वाटतो?

TEDxNewYork

एमिली बालसेटिस: काही लोकांना व्यायाम इतरांपेक्षा कठीण का वाटतो?
3,770,270 views

काही लोकांना वजन आटोक्यात ठेवण्यासाठी इतरांपेक्षा जास्त झगडावं का लागतं? सामाजिक मानसशास्त्रज्ञ एमिली बालसेटिस या प्रश्नाच्या अनेक घटकांपैकी एका घटकाविषयीचं संशोधन दाखवताहेत: दृष्टीविषयीचं. या माहितीपूर्ण भाषणात, त्या दाखवून देताहेत, की आरोग्याच्या बाबतीत, काही लोकांना जग निराळं दिसतं. इतर लोकांना दिसतं त्यापेक्षा निराळं. - आणि ही तफावत नाहीशी करण्यासाठी त्या, एक आश्चर्य वाटण्याइतपत सोपं उत्तर सुचवताहेत.

रिषी मनचंदा: आपण आजारी कशामुळे पडतो? उगमाकडे बघा.

TEDSalon NY2014

रिषी मनचंदा: आपण आजारी कशामुळे पडतो? उगमाकडे बघा.
1,843,333 views

एक दशकभर रिषी मनचंदा यांनी दक्षिण मध्य लॉस अँजेलीस मध्ये एक डॉक्टर म्हणून काम केले आहे, जिथे त्यांना कळून चुकलं: त्यांचं काम हे केवळ पेशंटच्या लक्षणांवर उपचार करणे नव्हे, तर त्यांना आजारी करणाऱ्या गोष्टींच्या - उगमाकडील घटकांच्या म्हणजेच कुपोषित आहार, तणावपूर्ण नोकरी, ताज्या हवेची कमतरता - मुळाशी जाणे आहे. तपासणीच्या खोलीबाहेरील रोग्याच्या आयुष्याकडे लक्षपूर्वक पाहणे हे डॉक्टरांना केलेलं एक मोठं आवाहन आहे.

शुभेंदू शर्मा: कोठेही छोटे वन कसे उगवायचे

TED2014

शुभेंदू शर्मा: कोठेही छोटे वन कसे उगवायचे
1,294,318 views

मनुष्याद्वारा लावले गेलेले वन, नंतर त्यास वाढीसाठी वातावरणात सोडल्यानंतर जवळपास त्यास पूर्ण तयार होण्यासाठी १०० वर्षे लागतात. पण आपण जर १० पटीने वेगाने वाढ करू शकलो तर? ह्या चोड्या व्याख्यानात, पर्यावरण तज्ञ आणि टेड फेलो शुभेंदू शर्मा सांगतात कि कसे वन परिस्थिती निगराणी करण्यासाठी एको सिस्टम बनवू शकतो, कुठे पण.

जैकी सवित्झ: महासागर वाचवा, जगाला अन्न पुरवा!

TEDxMidAtlantic 2013

जैकी सवित्झ: महासागर वाचवा, जगाला अन्न पुरवा!
1,259,324 views

एक समुद्रजीवशास्त्रज्ञ जगातल्या भुकेबद्दल का बोलतेय? जैकी सवित्झ म्हणतात, जगातल्या महासागरांची काळजी घेतली, तर या ग्रहावरच्या अब्जावधी भुकेल्या लोकांचं पोषण होण्यात मदत होऊ शकेल. सवित्झ यांचं हे भाषण जगभरातल्या मच्छीमारकेंद्रांत खरोखर काय चालतं - चांगलं नाही – ते सांगेल. आणि ते सुधारून, सर्वांसाठी अधिक अन्न कसं निर्माण करायचं याविषयी नेमके सल्ले देईल.

साराह लुईस: समीपच्या विजयाला अंगीकारा

TED2014

साराह लुईस: समीपच्या विजयाला अंगीकारा
2,737,190 views

कला इतिहासकार साराह लुईस ह्यांनी आपल्या संग्रहालयातील पहिल्या नौकरीत त्या अभ्यास करत असलेल्या कलाकाराबद्दल एक महत्वपूर्ण गोष्ट जाणली - सर्वच कलाकृती ह्या सर्वतोपरी उत्कृष्ट नसतात. त्या आपल्याला आयुष्यातील अगदी पराभव, समीपचा विजय ह्यांचे महत्व जाणायला सांगतात. आपल्या यश आणि नैपुण्य गाठण्याच्या निरंतर वाटचालीमध्ये, समीपचे विजय खरंच प्रेरणादायी ठरते काय?

झियाउद्दीन युसफ़झई: मलाला, माझी कन्या.

TED2014

झियाउद्दीन युसफ़झई: मलाला, माझी कन्या.
2,536,881 views

पाकिस्तानी शिक्षक झियाउद्दीन युसफ़झई एका साध्या सत्याची जगाला आठवण करून देताहेत. असं सत्य जे अनेकांना ऐकायचं नसतं. स्त्रियांना पुरुषां प्रमाणेच शिक्षण, कृतीस्वातंत्र्य आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याच्या समान संधींचा हक्क आहे. ते त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या, मलालाच्या, आयुष्यातल्या गोष्टी सांगतात. मलाला, जिला तालिबानने २०१२ साली गोळी मारली होती, केवळ शाळेत जाण्याचं धाडस केल्याबद्दल. "माझी मुलगी इतकी कणखर कशी?" युसुफ़झई विचारतात, " मी तिचे पंख छाटले नाहीत, म्हणून."

मनू प्रकाश: अर्ध्या डॉलर चा दुमडणारा ओरिगामी सूक्ष्मदर्शक

TEDGlobal 2012

मनू प्रकाश: अर्ध्या डॉलर चा दुमडणारा ओरिगामी सूक्ष्मदर्शक
2,182,867 views

कदाचित तुम्ही एक कागदी बाहुली किंवा ओरीगामिचा हंस तयार केला असेल? टेड फेलो मनू प्रकाश आणि त्याचे सहकार्यांनी पुठ्ठ्यापासून सुक्ष्मदर्शिका तयार केली आहे जी दुमडण्यासाठी आणि वापरासाठी सोपी आहे. एक रंगीत तालीम जी विकसनशील देशांची स्वास्थ्य सेवेत बदल करेल… आणि विज्ञान संशोधन, तसेच काही सुद्धा मनोरंजक बनवू शकते.

क्रिस्टा डोनाल्डसन: जीवन बदलणारा ८० डॉलरचा कृत्रिम गुढगा

TEDWomen 2013

क्रिस्टा डोनाल्डसन: जीवन बदलणारा ८० डॉलरचा कृत्रिम गुढगा
1,086,707 views

आपण गत काही वर्षात अपूर्व कामगिरी तंत्रज्ञानात केली आहे .पण बहुदा असे दिसते काही सुदैवी लोकांनाच याचा लाभ मिळतो .इंजिनियर क्रिस्टा डोनाल्डसन गुढगा गमाविलेल्यांसाठी कृत्रिम अवयवाची ओळख करून देते,जयपूरच्या एका संघटनेने यासाठी मदत केली. दिवसाकाठी चार डॉलरहून कमी कमाई असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम व स्वस्त आहे .

Jane McGonigal: भव्य एकाधिक खेळाडू... अंगठेबाजी?

TEDGlobal 2013

Jane McGonigal: भव्य एकाधिक खेळाडू... अंगठेबाजी?
1,226,581 views

काय होता जेंव्हा तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना उभे करता आणि एकमेकांना जोडता? गोंधळ, तेच का. तरी , हेच घडले जेंव्हा जेन मक्गोनिगल ला टेड प्रेक्षकांना तिचा आवडता खेळ शिकवायची संधी मिळाली. तर परत, "भव्य एकाधिक खेळाडू अंगठेबाजीचा" खेळ असेल तर तुम्ही काय अपेक्षा करू शकता?

केली मकगोनिगल: ताणाला तुमचा मित्र कसा कराल

TEDGlobal 2013

केली मकगोनिगल: ताणाला तुमचा मित्र कसा कराल
22,520,850 views

ताण ज्यामुळे तुमचे हृदय धडधडते श्वसन जलद होते कपाळावर घाम येतो .ताण हा आरोग्याचा शत्रू आहे असा समाजात समज आहे .मात्र नवे संशोधन सूचित करते तुमची अशी धारणा असेल की ता ण हानिकारक आहे तर त्या धारणेने तुमच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होईल.ताणाला मित्र माना व आरोग्य प्राप्त करा हे तळमळीने सांगत आहे मानसिक आरोग्यविशारद केली मकगोनिगल ताणाकडे सकारात्मक रित्या पाहून शरीराच्या अनोख्या बचाव तंत्राची ओळख त्या सर्वांना करून देत आहेत.

ShaoLan: शाओलान ह्स्युः शिका चीनी वाचन ... सहजतेने!

TED2013

ShaoLan: शाओलान ह्स्युः शिका चीनी वाचन ... सहजतेने!
4,781,742 views

परदेशातील लोकांसाठी, चिने भाषा बोलायला शिकणे अवघड असते. परंतु, चीनी लिखित भाषेतील सुंदर, पण क्लिष्ट अशी अक्षरे वाचायला शिकणे तितके अवघड नव्हे. शाओलान आपल्याला एका सोप्या पाठाद्वारे ही अक्षरे आणि त्यांच्या मागची कल्पना समजून घेण्यास मदत करते - काही सोप्या रचनांपासून क्लिष्ट संकल्पनांपर्यंत. म्हणा याला - चायनीजी (सोपे चीनी)

सुगाता मित्रा: मेघातील /क्लाऊड मधली शाळा

TED2013

सुगाता मित्रा: मेघातील /क्लाऊड मधली शाळा
3,417,649 views

TED2013 व्यासपीठावर, सुगाता मित्रा ठळकपणे टेड पुरस्कार इच्छा करतात : मला मेघ शाळा बनवन्यात करण्यात मदत दे, जेथे मुले एकमेकांना बरोबर शिकतात, जेथे भारतात, एका शिक्षण शाळेत - मुले ढगातून संसाधने वापरून शिकतातील. त्याची प्रेरणा दृष्टी ऐका आणि tedprize.org वर अधिक जाणून घ्या.

ब्रुनो मैसोनियर: ब्रुनो मैसोनियर : नृत्य, लघु यंत्रमानव!

TEDxConcorde

ब्रुनो मैसोनियर: ब्रुनो मैसोनियर : नृत्य, लघु यंत्रमानव!
1,397,385 views

फ्रांसमध्ये अशी एक जागा आहे, जिथे यंत्रमानव नाचतात. आणि, ती जागा आहे, टेडेक्सकॉन्कॉर्ड. जिथे अल्देबरण रोबोटिक्सचे ब्रुनो मैसोनियर लहान यंत्रमानवांचे नृत्य बसवतात, जे भावना उंचबळवणारे असतात.

शबाना बसीज-रसिख: अफगाण मुलींना शिकवण्याचं आव्हान: Shabana Basij-Rasikh: Dare to educate Afghan girls

TEDxWomen 2012

शबाना बसीज-रसिख: अफगाण मुलींना शिकवण्याचं आव्हान: Shabana Basij-Rasikh: Dare to educate Afghan girls
1,085,179 views

कल्पना करा अशा एका देशाची, जिथे मुलींना लपून छपून शाळेत जावं लागतं. आणि शिकताना पकडलं गेलं तर प्राणघातक परिणाम भोगावे लागतात. असा होता तालिबानच्या अंमलाखालचा अफगाणिस्तान. या भयाचा अंश आजही शिल्लक आहे. बावीस वर्षांची शबाना बसीज-रसिख अफगाणिस्तानात मुलींसाठी शाळा चालवते. ती एका कुटुंबाच्या, मुलींवर विश्वास टाकण्याच्या निर्णयाचं कौतुक करते. आणि धमक्यांना तोंड देणाऱ्या तिथल्या एका शूर पित्याची कहाणी सांगते.

एन्डी पुडडीकोम्बे : त्यासाठी   फक्त सजग १० मिनिटे लागतात.

TEDSalon London Fall 2012

एन्डी पुडडीकोम्बे : त्यासाठी फक्त सजग १० मिनिटे लागतात.
11,093,399 views

तुम्ही पूर्ण १० मिनिटे 'अजिबात काहीही न करणे' शेवटचे कधी केले होते? एसएमएस करणे नाही?, बोलणे किंवा विचार करणे नाही?.सजगता तज्ञ एन्डी पुडडीकोम्बे करत आहेत. "अजिबात काहीही न करण्यातील" परिवर्तनाच्या शक्तिचे वर्णन: केवळ सजगतेने आत्ताचा क्षण अनुभवुन तुमचे मन दररोज १० मिनिटे ताजेतवाने करणे.(उदबत्तीची किंवा विचित्र अवस्थेत बसण्याची गरज नाही.)

स्टीवन अदिस : वडील व मुलगी बंध, एका वेळी एक फोटो.

TED2012

स्टीवन अदिस : वडील व मुलगी बंध, एका वेळी एक फोटो.
1,553,695 views

काही वर्षापूर्वी न्यूयॉर्क शहरात स्टीव अदिस आपल्या एक वर्षाच्या मुलीला घेऊन रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा असताना त्याच्या पत्नीने त्यांचा फोटो काढला. त्या फोटोमुळे स्फुरला एक वार्षिक, वडील व मुलगी - सहल विधी; ज्यात अदिस आणि त्याची मुलगी, त्याच फोटोसाठी, त्याच कोपरयावर, दर वर्षी फोटो साठी येऊ लागले. अदिस आपल्याला सहभागी करतो आहे, त्याने खजिन्या प्रमाणे जपलेल्या १५ फोटोच्या मालिकेत आणि शोध घेतो आहे खूप काही आहे का या छोट्याशा वारंवार पाळलेल्या परंपरेमध्ये.

मुनीर विरानी: मला गिधाडे का प्रिय आहेत ?

TED@Nairobi

मुनीर विरानी: मला गिधाडे का प्रिय आहेत ?
1,134,254 views

निसर्ग निर्मित सफाई कर्मचारी -गिधाडे आपल्या पर्यावरणासाठी फार महत्वाची आहेत. मग त्याना वाईट प्रसिद्धी का? त्याना नामशेष होण्याचा धोका का? जीवशास्त्रज्ञ मुनीर विरानी म्हणतात की दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्याना वाचविण्यासाठी आपण या अद्वितीय पण गैरसमज असलेल्या जीवांकडे लक्ष दिले पाहिजे